Bangladesh Plane Crash : विमान वेगात आलं अन् थेट शाळेवर धडकलं; क्षणात मोठा स्फोट अन्… बघा VIDEO
हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घटनेची पुष्टी केली असली तरी अपघाताचे कारण किंवा जीवितहानी याबबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. बांगलादेशच्या ढाकात एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. बांगलादेशमधील हवाई दलाचं विमान वेगाने आलं आणि थेट एका शाळेवर कोसळलं आहे. या मोठा दुर्घटनेत विमान पायलटचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश हवाई दलाचे एक F-7 प्रशिक्षण विमान आज दुपारी १:३० वाजता राजधानी ढाका येथील उत्तरा भागातील दियाबारी भागात कोसळले. विमान माइलस्टोन कॉलेजच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये असलेल्या शाळेवर कोसळले आणि शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात गोंधळ उडाला. या अपघाताचे काही व्हिडिओ घटना घडल्याच्या क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. F-7 हे चिनी विमान आहे. अशीही माहिती समोर येतेय की, बांगलादेश हवाई दलाच्या F-7 प्रशिक्षण विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि २४ मिनिटांनी दुपारी १:३० वाजता शाळेवर कोसळले मात्र अद्याप जीवितहानी बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

