रोहित पवारांकडून अजितदादांचं जंगी स्वागत, जामखेडमधल्या ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा, नेमकं लिहिलंय तरी काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पहिल्यांदाच रोहित पवार यांच्या मतदारसंघात दाखल होत आहे. पहिल्यांदाच रोहित पवार हे कर्जत जामखेडमध्ये येणार असल्याने रोहित पवार यांच्याकडून तुफान बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळतंय.
राष्ट्रवादीच्या फूटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पहिल्यांदाच कर्जत जामखेडमध्ये दाखल होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असल्याने अजित पवारांच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. अशातच अजित पवार यांच्या या दौऱ्यांच्या निमित्ताने रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कर्जत जामखेड या मतदारसंघात रोहित पवारांकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवर कर्जत जामखेड यांच्या पावनभूमीत अजित पवार यांचं सहर्ष स्वागत असा मजकूर दिसतोय. तर आमदार रोहित पवार मित्र परिवार आणि समस्त कर्जत-जामखेडकर हे स्वागतोस्तुक असल्याचे या बॅनरवर दिसतंय.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?

