Baramati NCP Sharad Pawar Protest | महागाईने जनता त्रस्त; बारामतीत राष्ट्रवादीचा सरकारविरोधात एल्गार
वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरत्या दरांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आज बारामतीमध्ये आक्रमक झाली आहे. विविध जनहिताच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून, बारामतीतील तीन हत्ती चौक परिसरात हे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते युगेंद्र पवार करत असून, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून, महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक भूमिका घेत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीतील हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात असून, राज्य सरकारविरोधातील नाराजी व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला.
दरम्यान, या आंदोलनामुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशाच प्रकारच्या आंदोलनांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.