AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'या' जिल्ह्यात आजपासून 11 मे पर्यंत मनाई आदेश लागू! काय आहे कारण? कोणता जिल्हा?

‘या’ जिल्ह्यात आजपासून 11 मे पर्यंत मनाई आदेश लागू! काय आहे कारण? कोणता जिल्हा?

| Updated on: Apr 30, 2023 | 9:47 AM
Share

तर आंदोलन करणाऱ्या 201 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यात 164 महिलांना टेबल जामीन देऊन सोडण्यात आलं. तर 37 पुरूषांना राजापूर न्यायालयात हजर केलं असता त्यांना जामीन देऊन सोडण्यात आलं.

रत्नागिरी : बारसू रिफायनरी प्रकल्पाचा (Barsu Refinery Survey) वाद आता चांगलाच पेटला आहे. दोन दिवसांपुर्वी सर्वेक्षण होत असताना ग्रामस्थांनी विरोध केला. त्यावेळी ग्रामस्थांची बाजू न ऐकता ते सर्वेक्षण (Barsu Refinery Survey) रेटण्यात आलं. त्यावरून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वेक्षण स्थळी धाव घेतली. यामुळे एकच गोंधळ उडाला. ज्यामुळे पोलिसांनी अश्रू धुराच्या (Tear Gas) नळकांड्या फोडल्या. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. लाठीचार्जही (Lathi Charged) केला. तर आंदोलन करणाऱ्या 201 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यात 164 महिलांना टेबल जामीन देऊन सोडण्यात आलं. तर 37 पुरूषांना राजापूर न्यायालयात हजर केलं असता त्यांना जामीन देऊन सोडण्यात आलं. यावरून बारसु येथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात किरकोळ कारणावरून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश दिला आहे. जो आजपासून 11 मे पर्यंत लागू असेल.

Published on: Apr 30, 2023 09:47 AM