Mumbai – Pune एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर धिम्या गतीनं वाहतूक
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune expressway) वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune expressway) वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर (Lane) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर वाहनाची संख्या वाढल्याने अमृतांजन पुलाजवळ (Amrutanjan Bridge) वाहनांची (Vehicles) प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे आधीच उन्हाने बेजार झालेल्या नागरिकांना आणखी ताप झाला आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडलेत खरे, पण वाहतूक कोंडीने त्यांना वेढले आहे. लोणावळा, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक बाहेर आल्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. दुपारची वेळ असल्याने बराचसा वेळ या धिम्या वाहतुकीतच जात असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

