बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, पीडितेकडून दोनदा आत्महत्येचा प्रयत्न अन्...

बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, पीडितेकडून दोनदा आत्महत्येचा प्रयत्न अन्…

| Updated on: Jan 21, 2025 | 2:41 PM

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा HIV मुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवून कुटुंबाला वाळीत टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाला अशी अफवा पसरवत संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावात समोर आला आहे. ही अफवा पसरविण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जात आहे. पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे तक्रार केल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एचआयव्ही झाल्यामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवली जात असल्याने पीडितेकडून यापूर्वी दोन वेळा आत्महत्या करण्यात आल्यात प्रयत्न झाल्याचीही माहिती मिळतेय.  मुलीचा एचआयव्हीमूळे मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्याने दिल्याने समाजात बदनामी झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. पीडित कुटुंबाने पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत फोनवर केलेला संवाद देखील समोर आला आहे. सध्या फोनवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र टीव्ही ९ मराठी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. बघा व्हिडीओ…

Published on: Jan 21, 2025 02:41 PM