Beed Crime : क्लासमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपीचे मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल अन् नेत्यांमध्ये जुंपली
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी बीड शहरात कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलंय. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत नागरिकांनी निषेध व्यक्त केला. आरोपींना मदत करणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक झालेत. या प्रकरणात आमदार संदीप शिरसागर यांच्या फोटोचा सीडीआर काढावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली पंकजा मुंडेनी ही या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींचे धनंजय मुंडे सोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
बीड विनयभंग प्रकरण नेमकं काय?
बीडमधल्या एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला. या प्रकरणात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांना अटक पोक्सो कायद्याअंतर्गत दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे. जुलै 2024 मध्ये प्रशांत खाटोकर या शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला होता त्याच वेळी मुलीने क्लासचे संचालक विजय पवार यांच्याकडे तक्रार केली. विजय पवार यांनी कारवाई करण्याऐवजी त्या मुलीसोबत अश्लील कृत्य केलं असं तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीडमधल्या या प्रकरणावरून स्थानिक नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे

हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?

रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला

मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने

प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
