Satish Bhosale : खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
Khokya Bhosale On Hunger Strike : शिरूर कासार येथील मारहाण प्रकरणाचा आरोपी सतीश भोसले हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याने आजपासून पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
शिरूर कासारच्या मारहाण प्रकरणातील आरोपी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याने पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
शिरूर कासार येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्यावर हरणांची शिकार केल्याचा देखील आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर वन विभागाने खोक्या भोसले याचं घरं अतिक्रमण असल्याचं सांगत त्यावर तोडक कारवाई केली होती. त्यानंतर काही अज्ञात इसमांनी सतीश भोसलेच्या घरावर हल्ला करून घर जाळलं. तसंच त्याच्या कुटुंबाला मारहाण देखील केली. याच संदर्भात आता खोक्याने कोठडीत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. घर जाळणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे. पोक्सो, अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नाही आणि न्याय मिळत नाही तोवर आपण अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं म्हंटलं आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

