Beed | वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत!  थेट कैद्यालाच मारलं अन्…

Beed | वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्…

| Updated on: Apr 22, 2026 | 6:16 PM

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर कराड गॅंगपैंकी अनेक जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींनी आता कारागृहात देखील दहशत माजवली आहे. वाल्मिक कराड गँगशी संबंधित काही आरोपींनी एका कैद्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर कराड गॅंगपैंकी अनेक जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींनी आता कारागृहात देखील दहशत माजवली आहे. वाल्मिक कराड गँगशी संबंधित काही आरोपींनी एका कैद्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर कारागृहातील वातावरण तणावपूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा कारागृहात घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहितीनुसार, बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून ही घटना घडली. या वादात काही आरोपींनी अझर पठाण नावाच्या कैद्याला मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर कैद्यांमध्ये वाद वाढला आणि शाब्दिक बाचाबाचीही झाली.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये संबंधित कैद्याने मारहाणीबरोबरच जेल प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे कारागृहातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असून, सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.

Published on: Apr 22, 2026 06:16 PM
Follow Us