Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walmik Karad CCTV Video : 'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस पुन्हा आक्रमक

Walmik Karad CCTV Video : ‘आका’सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस पुन्हा आक्रमक

| Updated on: Jan 22, 2025 | 10:24 AM

बीड खंडणी प्रकऱणातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्या दिवशीचे हे CCTV फुटेज असल्याची माहिती मिळतेय. या व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड यांच्यासह सर्व आरोपी दिसताय

आरोपी वाल्मिक कराडसह त्याची टोळी एकाच वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या आधी काही दिवस आधी खंडणीसाठी फोन कऱण्यात आला. याचा पुरावा याच सीसीटीव्हीत कैद झालाय. धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडच्या टोळीसोबत पोलीस अधिकारी राजेश पाटीलही या सीसीटीव्हीत दिसताय. या सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक कराड, विष्णु चाटे, प्रतिक घुले, सुदर्शन घुले हे अटकेतील सर्व आरोपी दिसताय. तर या फुटेजमध्ये कृष्णा आंधळे देखील आहे. मात्र अद्याप कृष्णा आंधळे बीड पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागलेला नाही. केज तालुक्यातील २९ नोव्हेंबरचं हे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती मिळतेय. वाल्मिक कराड आणि त्याची ही टोळी २९ नोव्हेंबरला विष्णु चाटे याच्या कार्यालयात आली होती. विशेष म्हणजे या आरोपींसह सरपंच हत्येनंतर निलंबित पीआय राजेश पाटीलही दिसताय. विष्णु चाटे याच्या कार्यालयात आल्यानंतर कराडने चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या संजय शिंदेंना फोन करून दोन कोटींची खंडणी मागितली. तर संजय शिंदेंच्या तक्रारीनुसार जवळपास १० ते साडे दहा वाजेच्या सुमारास विष्णु चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकावलं, नेमकं पुढे काय घडलं ? बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 22, 2025 10:24 AM