‘लांडग्यांचं पिल्लू’, आता ‘लाचारांची औलाद’, का होताहेत अजितदादा टार्गेट?
अजित पवार अडीच वर्ष सत्तेत तर वर्षभर विरोधी पक्षात होते. आता सत्ताधारी विशेषत: भाजपचेच आमदार दादांना लबाड लांडग्यांचं पिल्लू म्हणताहेत. तर विरोधी पक्षनेते त्यांना लाचाराची औलाद म्हणालेत. विरोधक आणि सत्ताधारी आमदारही दादांना टार्गेट का करताहेत?
मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | अजित पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवरुन सुरु झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. त्यातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही अजित दादांवर बोचरी टीका केलीय. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोबरे चांगल्याच भडकल्या आहेत. पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर लबाड लांडग्याचं पिल्लू अशी विखारी टीका केली. मात्र, त्यावर स्वत: अजित दादा यांनी काहीच वक्तव्य केले नाही. पण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादा यांची माफी मागितली. याच वादावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना टोकाचे शब्द वापरले. सत्तेच्या लाचारीसाठी पडळकरांना अजित दादांनी उत्तर दिले नाही. त्यामुळं ही लाचारांची औलाद आहे, असं वडेट्टीवार म्हणालेत. त्यावरून रुपाली ठोबरे यांनी वडेट्टीवार यांना जाहीर इशारा दिलाय. तुमची औलाद कोणती हे विचारायला भाग पाडू नका असे त्या म्हणाल्यात.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित

