बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली, जीव धोक्यात घालून प्रवास
जोरदार पावसामुळे बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेला आहे. तरीही परिसरातील काही नागरिक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करत आहेत.
राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत असून अजूनही काही रस्ते पाण्याखालीच असल्याचे दिसून येत आहे. भीमाशंकर परिसरातही जोरदार पाऊस होत असून घोडे नदीला पुराचा फटका बसला आहे. या पुराच्या पाण्यामुळे परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तरीही नागरिक पुराच्या पाण्यातून वाट काढत जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. घोडे नदीला पूर आल्याने बेल्हे-जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेला असून शिरुर आंबेगाव तालुक्याचा संपर्क तुटला आहे. परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने भीमाशंकर परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Published on: Sep 18, 2022 12:35 PM
Follow Us
Latest Videos
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
