BEST Bus : मुंबईकरांनो तुम्ही बेस्ट बसने प्रवास करताय? बेस्टच्या भाडेवाढीनंतर आता आणखी एक बदल, येत्या 1 जूनपासून…
बेस्ट उपक्रमाने तिकीट दरात वाढ केल्यानंतर आता बेस्टच्या वाहतूक सेवेत बदल केला आहे. जाणून घ्या सविस्तर
मुंबईकरांनो तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही बेस्ट बसने प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा.. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता आणि एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाने बेस्टकडून काही बदल करण्यात आले आहेत. बेस्ट उपक्रमाकडून बेस्टच्या तिकीट दरात वाढ केल्यानंतर आता बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बस सामील होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळेच बेस्टच्या काही मार्गात येत्या रविवार म्हणजेच १ जूनपासून बदल केले जाणार आहे. तर काही नवे बस मार्ग सुरू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बेस्ट उपक्रमाने ३० बस मार्गांमध्ये बदल केले असून हे बदल १ जून २०२५ पासून लागू होतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. या नूतनीकरणात नवीन वातानुकूलित मार्ग सुरू करणे, विद्यमान सेवांचे मार्ग बदलणे, क्रमांक बदलणे आणि वाहतूक वेळापत्रकात बदल असा समावेश आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

