Video : मोदींच्या जादूमुळे भारतीयांचा परदेशात गौरव वाढला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य

मोदी वीस वीस तास काम करतात. आपल्याला असं नेतृत्त्व मिळालं आहे, की दुनियेतील लोकं भारतीयांचा सन्मान करताय, असंही ते म्हणालेत.

सिद्धेश सावंत

|

Aug 06, 2022 | 9:29 AM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विदेशात भारतीयांचा सन्मान आता वाढला आहे, असा दावा भगतसिंग कोश्यारी यांनी केलाय. हे नरेंद्र मोदींमुळे (Narendra Modi News) शक्य झालं असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय. ‘मोदी वीस वीस तास काम करतात. आपल्याला असं नेतृत्त्व मिळालं आहे, की दुनियेतील लोकं भारतीयांचा सन्मान करताय. मोदींनी स्वाभिमान जागवल्यामुळे परदेशात भारतीयांचा गौरव होतो, त्यांच्या पाठीवर कौतुकात थाप पडते’, असं वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाणा आलंय. याआधी मुंबई (Mumbai) आणि मराठी माणूस यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली होती. मराठीचा आणि मुंबईचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी माफीदेखील मागितली होती.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें