भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं? मुंडेंना पाठिशी घालणारे नामदेव शास्त्री नेमके कोण?

भगवानगडाचं ‘राजकीय’ दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं? मुंडेंना पाठिशी घालणारे नामदेव शास्त्री नेमके कोण?

| Updated on: Feb 01, 2025 | 11:21 AM

धनंजय मुंडेनी लावलेल्या सलाइन्सपेक्षा धनंजय मुंडे आणि कराडमुळे अनाथ झालेली लेकरं, विधवा बायका, पोटची पोरे गमावणारे आई-बाप, अपंग झालेले लोक, तुरुंगात पडलेले लोक यांच दुःख फार मोठ आहे ते महंत म्हणून तुम्ही समजून घेणार का?

गेल्या काही वर्षांपूर्वी गडावरून वादात आलेले नमदेव शास्त्री पुन्हा आपल्या वक्तव्याने वादात आले आहेत. मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही असं वक्तव्य त्यांनी केले आहे. मात्र पंकजा मुंडे सोबतच्या वादानंतर कधीच राजकीय भूमिका घेणार नसल्याचं म्हणणाऱ्या महंतांवर अनेक प्रश्न नेत्यांनी केले. नगरच्या पाथर्डीत असलेल्या भगवान गडाचे ते महंत आहेत. भगवान गड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी इथे गडावर लाखो लोक येतात. 2016 ला गडावर राजकीय भाषण नको म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना विरोध केला होता. त्यावरून मोठा संघर्षही झाला. त्यावेळच्या व्हायरल क्लिपमध्ये महंत असलेल्या नमदेव शास्त्री यांच्या संवादावरून वादही रंगला. अखेर पंकजा मुंडे यांना भगवान गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला. 2017 ला भगवान बाबांचं गाव सावरगावात पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड स्थापन केला. तेव्हापासून पंकजा मुंडेंचा मेळावा सावरगावातच होतो. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपींवर खुनाचा आरोप झाला. हत्येनंतर बाप तो बाप रहेगा यासारखे बॅनर लागले. आमचा नाद करू नका म्हणून स्टेटस ठेवले गेले. त्याआधी आरक्षण वादात जातीला चिथावणी देणारी विधानं केली गेली. तेव्हा मौन राहणाऱ्या नमदेव शास्त्रींना हत्येच्या दोन महिन्यानंतर जातीय सलोखा आठवला का? असे प्रश्न सोशल मीडियातून विचारले जात आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 01, 2025 11:21 AM