अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतात पाणी साचल्यानं ‘या’ पिकांनी टाकली मान
VIDEO | भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका, शेतात पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान
भंडारा : गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका काकडी, डांगरू पिकांना बसला आहे. तर अवकाळी पावसामुळे ढेमसंच्या शेतीत पाणी साचल्यामुळे ढेमसं उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळ बागायती उत्पादकांना मोठया प्रमाणात फटका बसला आहे. ढेमसे, डांगरू, काकडी अशा फळ बागांनी शेकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला. तेव्हा शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे टमाटे, मिरची पिकांचे प्रचंड नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यात अचानकपणे कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टमाट्याची पिकं गळून पडली तर मिरची आणि इतर काही पिकेही जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

