Bhaskar Jadhav : मला मंत्रिपद का मिळायला नको, हे सांगावं, भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
Bhaskar Jadhav News : ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावना आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.
मी शरद पवार यांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो. पण मला त्याची खंत वाटतंय असं अजिबात नाही. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवं. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून काय रडत बसायचं का? उलटं लढायचं, असं ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी म्हंटलं आहे. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नसल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी जे फुटून गेले त्यांच्याबरोबरही मी गेलो नाही. मी लढत आहे, अशी खदखद देखील भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, शरद पवार यांची साथ सोडली, त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, असं अजिबात नाही. तसं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. मी शरद पवार यांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो. पण मला त्याची खंत वाटतंय असं अजिबात नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

