Bhaskar jadhav : अध्यक्षपदाची निवड दीड वर्ष झाली नाही, नवं सरकार आल्यानंतर लगेच झाली, असा कोणता कायदा बदलला, भास्कर जाधव यांचा सवाल

राज्यपालांना सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या कामात बाधा आणण्याची भूमिका घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की, राज्यपाल भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी आहेत का, अशीही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे. अधिक जाणून घ्या...

शुभम कुलकर्णी

|

Aug 06, 2022 | 5:52 PM

मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना सवाल करत टीकास्त्र सोडलंय. ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवड दीड वर्ष झाली नाही, नवं सरकार आल्यानंतर लगेच अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. असा कोणता कायदा यावेळी बदलला, महाविकास आघाडी सरकार असताना दीड वर्ष कसे लागले, असा सवाल भास्कर जाधव यांनी केलाय. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा घरगडी असा उल्लेख केला होता. यावर भास्कर जाधव यांनी भाष्य केलंय. ‘कोश्यारी यांनी अनेकदा भाजपकडून निर्णय घेतले आहेत. राज्यातील विविध गोष्टींचा केलेला अपमान यामुळे त्यांच्या विषयी सगळ्याच जाती, धर्म, पंथाच्या लोकांच्या मनात राग आहे. राज्यपालांनी घटनेनुसार राज्य चालतंय की नाही, हे बघाव. इतकेच त्यांचे अधिकार, मात्र, राज्यपालांना सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या कामात बाधा आणण्याची भूमिका घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की, राज्यपाल भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी आहेत का, अशीही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे. राज्यपालांचे अनेक निर्णय हे पक्षपाती आहे.’ यावेळी भास्कर जाधव यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलंय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलंय.

 

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें