AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Crisis | भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नसल्याची माहिती; नेमकं घडतंय काय?

Shivsena Crisis | भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नसल्याची माहिती; नेमकं घडतंय काय?

| Updated on: Jun 17, 2026 | 10:18 AM
Share

राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा चांगलीच रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा चांगलीच रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र भूमिका घेणार की अन्य कोणता राजकीय निर्णय होणार, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. ते काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

तसेच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ही दिल्लीत पोहोचल्याची माहिती मिळत आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. त्यांनी कोणती भूमिका घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीत असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील संभाव्य राजकीय घडामोडींविषयी चर्चांना वेग आला आहे. मात्र स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा कोणत्याही पक्षात विलीन होणे यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने सर्वांचे लक्ष पुढील घडामोडींवर केंद्रित झाले आहे.

राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना दिल्लीतील या हालचालींना महत्त्व प्राप्त झाले असून, पुढील काही तासांत किंवा दिवसांत याबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 17, 2026 10:18 AM

Follow Us
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी