Bhim army: भीमआर्मीचे नेते अशोक कांबळेना पोलिसांनी घेतले ताब्यात

औरंगाबाद येथे होत असलेली राज ठाकरे यांची सभा उधळवून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

May 01, 2022 | 3:26 PM

मुंबई – भीम आर्मीचे (Bhim army ) नेते अशोक कांबळे यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे होत असलेली सभा उधळण्यासाठी ते निघाले होते. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी(Mumbai  Police) ही कारवाई केली आहे. औरंगाबाद येथे होत असलेली राज ठाकरे यांची सभा उधळवून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. घाटकोपर येथील चिरागनगर येथील पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या सभेमध्ये कोणत्याही प्रकार अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें