Rupali Thombare Patil | कायद्याची प्रक्रिया इतकी सोपी नाही… रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
भोंदूबाबा अशोककुमार खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. महिलांना जाळ्यात ओढण्याची खरातची पद्धत समोर आली आहे, तसेच महिला आयोगाकडे तक्रारी देणाऱ्या काही महिलांना थेट खरातकडे पाठवले जात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या माजी सदस्यांची चौकशी होणार असून, माजी सदस्य रुपाली चाकणकर यांना एसआयटीने नोटीस बजावली होती.
भोंदूबाबा अशोककुमार खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. महिलांना जाळ्यात ओढण्याची खरातची पद्धत समोर आली आहे, तसेच महिला आयोगाकडे तक्रारी देणाऱ्या काही महिलांना थेट खरातकडे पाठवले जात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या माजी सदस्यांची चौकशी होणार असून, माजी सदस्य रुपाली चाकणकर यांना एसआयटीने नोटीस बजावली होती. मात्र, त्या चौकशीला हजर झाल्या नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या हजर न राहिल्यास त्यांना अटक होऊ शकते. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की, “रुपाली चाकणकर या प्रकरणात आरोपी असून त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. नेत्यांकडून त्यांना मिळालेला फेवर ही त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणारा आहे. कायद्याची प्रक्रिया सोपी नाही आणि काही दिवसांत त्यांना त्याची जाणीव होईल.” असा इशाराही रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला. या घटनेमुळे प्रकरणातील तपास आणि चौकशी अधिकच गती मिळण्याची शक्यता आहे.
Published on: Mar 31, 2026 02:56 PM
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी

