आता तिरूपती बालाजीचं दर्शन मुंबईतील ‘या’ ठिकाणी घ्या, मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालं भूमिपूजन
VIDEO | आपण भाग्यवान, कारण तिरुपती बालाजी मंदिर मुंबईत होतंय, एकनाथ शिंदे काय म्हणाले?
नवी मुंबई : तिरूपती बालाजीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तिरुपती बालाजी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेला आता नवी मुंबईतच तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणार आहे. नवी मुंबईतल्या उलवेनोडमध्ये तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी 6.45 वाजता प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. उलवेनोड येथील प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन केलं. तिरुपती तिरुमाला बालाजी संस्थानच्या वतीने हे मंदिर उभारण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाच या मंदिराच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज भूमिपूजन सोहळा पार पडला.
तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर नवी मुंबईत श्री व्यंकटेश मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या सहकार्यानं नवी मुंबईतील उलवे नोड येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारनं 500 कोटी रुपयांची 10 एकर जागा नवी मुंबईत बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिली असल्याची एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप

