मोठी बातमी! मुंबईत पालिकेची धडक कारवाई! 50 वर्ष जुन्या अवैध दर्ग्यावर बुलडोझर
मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली. सरकारी जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवत पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली
मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली. सरकारी जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवत पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यावेळी 50 वर्षे जुन्या हजरत सय्यद बरकत अली दर्ग्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पालिकेकडून याआधी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यांसमोर कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने अखेर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या परिसराला भेट देत पाहणी केली होती. त्यानंतर येथे अनधिकृत बांधकाम झाल्याची चर्चा अधिक रंगली होती. अखेर आज BMC आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत हे बांधकाम हटवले. सोशल मीडियावर या कारवाईचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
