शरद पवार यांच्या चरणाशी लोळण घातलेल्यांचा एक पाय भाजपात? ‘सामना’तून राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत मोठा दावा
VIDEO | अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या उंबरठ्यावर? सामनाच्या अग्रलेखातून शरद पवारांच्या राजीनाम्यासह अजित पवारांवर निशाणा
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांमध्येच अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य करत दोन कारणं असल्याचे म्हटले आहे. एक म्हणजे, पक्षातील ईडी सारख्या तपास यंत्रणामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात असावं. दुसरं कारण म्हणजे, अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले काय? यासह सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे, असे म्हणत शरद पवार यांच्या चरणाशी लोळण घातलेल्या लोकांचा एक पाय भाजपात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

