Breaking | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, प्रलंबित वेतनाचा प्रश्न मिटला

एसटी महामंडळाला मानव विकास योजनेतील 231 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे एसटीतील 93 हजार कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगार लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कामगारांचा दसरा गोड होणार आहे.

मुंबई: ऐन दसऱ्याच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटला आहे. एसटी महामंडळाला मानव विकास योजनेतील 231 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे एसटीतील 93 हजार कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगार लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कामगारांचा दसरा गोड होणार आहे. ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, या करीता गाव ते शाळा दरम्यान वाहतूकीची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी “मानव विकास कार्यक्रम” अंतर्गत योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो. या योजनेतंर्गत एस.टी. महामंडळाच्या बस वाहतूकीच्या खर्चापोटी राज्य शासनाकडून सन 2013-14 पासून रक्कम देणे प्रलंबित होते. तसेच इंधन किमतीची दरवाढ, चालनीय किलोमीटर तफावत, चालक व वाहक यांचे वेतनवाढ व बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च इ. विचार करुन पुर्वलक्षी प्रभावाने सन 2013-14 पासून वाढीव दराने अनुदान देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेतल्या होत्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI