देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय, Balasaheb Thorat यांची माहिती
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज सांगोला येथे आले होते. यावेळी आज पोट निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्रचार यंत्रणा लावलेली आहे. त्यामुळे काँग्रेस जिंकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नांदेड : देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. या पोटनिवडणुकीसाठी 64 टक्क्यांच्या जवळपास मतदान झालं. काँग्रेस तथा भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. आता मतदारांचा कौल कुणाला याचीच चर्चा आता रंगलीय. मतदार महाविकास आघाडी सोबत आहेत की भाजपच्या बाजूने याची चाचपणी म्हणजेच ही पोटनिवडणूक असे म्हटले जात आहे. 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघात 61 टक्के मतदान झाले होते. देगलूर विधानसभा पोट निवडणुकित काँग्रेसचा मोठा विजय होईल, असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज सांगोला येथे आले होते. यावेळी आज पोट निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्रचार यंत्रणा लावलेली आहे. त्यामुळे काँग्रेस जिंकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
