Bihar Election 2025 : बिहारच्या राजकारणात नेमकं घडतंय काय? ऐन निवडणुकीत लालू, तेजस्वीवर खटला अन् सत्ताधाऱ्यांना मौका!
बिहार विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर IRCTC भ्रष्टाचार प्रकरणात खटला चालणार आहे. यामुळे महाआघाडीच्या अडचणी वाढल्या असून, काँग्रेसच्या जागावाटपावरूनही तणाव आहे, तर एनडीएने जागावाटप निश्चित केले आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा धक्का बसला आहे. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याविरोधात IRCTC भ्रष्टाचार प्रकरणात खटला चालणार आहे. दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी भाजप आणि जनता दल (युनायटेड) युतीला निवडणुकीत आयताच मुद्दा मिळाला आहे.
दुसरीकडे, बिहारमधील जागावाटपाचा तिढाही चर्चेत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने आपले जागावाटप निश्चित केले आहे. भाजप आणि जनता दल (युनायटेड) प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत, तर लोक जनशक्ती पक्ष (चिराग पासवान गट) २९ जागा, राष्ट्रीय लोक मोर्चा ६ जागा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा ६ जागांवर लढणार आहे. मात्र, महाआघाडीमध्ये जागावाटपावरून तणाव कायम आहे. काँग्रेस ६० जागांवर अडून बसली आहे, तर आरजेडी त्यांना ५४ पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही, ज्यामुळे आघाडीत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

