Bihar Election Aftermath: भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली… महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा, आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं प्रत्युत्तर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंनी भाजपला अमेरिकेत निवडणुका लढवण्याचा टोला लगावला होता. यावर भाजपनेते जयकुमार रावळ यांनी प्रत्युत्तर देत मोदी साहेबांनी चंद्रावर शिवशक्ती कॉलनी उघडल्याचे वक्तव्य केले. चंद्रयान-३ च्या यशामुळे शिवशक्ती पॉईंटचे नामकरण झाले होते.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत, बिहार आणि महाराष्ट्राऐवजी अमेरिकेत निवडणुका लढवण्याचा टोला लगावला होता. या टीकेला भाजपनेते जयकुमार रावळ यांनी अनोखे प्रत्युत्तर दिले आहे. रावल यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ जगातच नव्हे, तर चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडली आहे. भारताचे नाव जगात मोठे करण्याचे काम भाजप करत असून, अनेक देश मोदींना मध्यस्थीसाठी बोलावतात, असेही रावळ यांनी नमूद केले. जयकुमार रावळ यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Nov 17, 2025 11:43 AM
Latest Videos
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

