Bihar Election Results 2025 : अलीनगरमध्ये मैथिली ठाकूर यांची मोठी आघाडी, तब्बल ‘इतक्या’ मतांनी पुढे..
बिहार निवडणूक 2025 च्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या मैथिली ठाकूर अलीनगरमध्ये 1800 मतांनी आघाडीवर आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए बहुमताकडे वाटचाल करत असून, नितीश बाबू पुन्हा मुख्यमंत्री होतील असे चित्र आहे. मोकामात अनंत सिंह यांनी दबदबा कायम ठेवला असून, राजदला मोठा धक्का बसला आहे.
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालांची सध्या मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या कलांनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या तब्येतीचे कारण पुढे केले असतानाही, बिहारच्या जनतेने सुशासनासाठी पुन्हा एकदा जेडीयू आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. अलीनगर मतदारसंघात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.
गायिका मैथिली ठाकूर या पहिल्या फेरीत 1800 मतांनी आघाडीवर आहेत. अलीनगर हा पारंपरिकरित्या राष्ट्रीय जनता दलाचा (RJD) बालेकिल्ला मानला जात होता, जिथे मैथिली ठाकूर यांनी विनोद मिश्रा यांना पिछाडीवर टाकले आहे. यामुळे भाजपला राजदचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याची संधी मिळाली आहे.
एकूण कलांनुसार, एनडीए 161 जागांवर आघाडीवर असून, महाआघाडी 78 जागांवर पुढे आहे. यामध्ये भाजप 70, जेडीयू 70 आणि एलजेपी 17 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडीमध्ये राजद 58 आणि काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याचे हे चित्र स्पष्ट करत आहे.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

