Bihar Election Results 2025 : आतापर्यंतच्या कलांनुसार JDU ची रेकॉर्डब्रेक आघाडी, NDA ला दणदणीत बहुमत
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एनडीएने दणदणीत बहुमत मिळवले आहे, ज्यात जेडीयूने विक्रमी आघाडी घेतली. भाजपच्या जागा कायम असताना जेडीयूने मोठी मुसंडी मारली आहे. नितीश कुमार यांचा हा भावनिक विजय मानला जात आहे. तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या कलांनुसार, एनडीएने दणदणीत बहुमत मिळवत एकतर्फी विजय संपादन केला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, जेडीयू ८३ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपने ८० जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. एलजेपी २२ जागांवर आघाडीवर असून, एनडीए एकूण १८९ जागांवर आघाडीवर आहे.
याउलट, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. आरजेडी केवळ ३३ आणि काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे, तर डाव्या पक्षांना ७ जागा मिळाल्या आहेत. महाआघाडी एकूण ४७ जागांवर आघाडीवर आहे. हा निकाल नितीश कुमार यांच्यासाठी भावनिक विजय ठरला असून, बिहारमध्ये पुन्हा एकदा “नीतीश कुमार” अशी घोषणाबाजी सुरू झाली आहे. विरोधकांच्या अँटी-इन्कम्बन्सी आणि मतचोरीच्या आरोपांचा निकालावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

