Bihar Election Results 2025 : नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत, बघा कार्यकर्त्यांचा जल्लोष
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एनडीएने दणदणीत बहुमत मिळवत तेजस्वी-राहुल गांधींच्या महाआघाडीचा धुव्वा उडवला आहे. एनडीए १८४ जागांवर आघाडीवर असून, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला जनतेने पुन्हा कौल दिला आहे. जेडीयू कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असून, नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची भावना व्यक्त केली.
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या कलानुसार एनडीएला दणदणीत बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा पूर्णपणे धुव्वा उडाला. एनडीए १८४ जागांवर आघाडीवर असून, महाआघाडी केवळ ५१ जागांवर मर्यादित राहिली. यात आरजेडीला ३५ तर काँग्रेसला एकेरी आकड्यात जागा मिळाल्या. जेडीयू सर्वाधिक ८१ जागांवर आघाडीवर आहे, ज्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
“बिहार का मतलब नितीश कुमार” असे पोस्टर आता पाटण्यात झळकत आहेत. जेडीयूच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी नितीश कुमार यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या भावना व्यक्त केल्या. विकासाच्या मुद्द्यावर आणि महिलांच्या योजनांमुळे नितीश कुमार यांना हे भरघोस जनादेश मिळाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

