Sanjay Raut UNCUT | राज्यपालांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचं रिटर्न गिफ्ट महाराष्ट्राला द्यावं : राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचं आपल्या स्टाईलमध्ये अभिष्टचिंतन केलं आहे. इतकंच नाही तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केलंय.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्वच पक्षांचे नेते कोश्यारी यांना शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचं आपल्या स्टाईलमध्ये अभिष्टचिंतन केलं आहे. इतकंच नाही तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा काही वेगळ्याच म्हणाव्या लागतील. कारण, संजय राऊत यांनी राज्यपालांना शुभेच्छा देताना विधान परिषदेच्या 12 आमदारांची रखडलेली नियुक्ती करुन महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहन केलंय.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता

