भाजप पदाधिकाऱ्याला जबर मारहाण, जखमी पदाधिकारी म्हणतो, माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला न्याय द्या

भाजपचे जिल्हा सरचिटणीस असलेल्या पदाधिकाऱ्याला विरोधकांनी बेदम चोप दिला. दरम्यान शैलेश आजगे असं मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव असून या मारहाणीत त्याचे कपडेही फाडण्यात आले.

विशाल ठाकूर

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 18, 2022 | 8:27 PM

साक्री नगरपंचायत मतदानादरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. मतदानाच्या वादावादीतून झालेल्या भांडण टोकाला गेलं. यांनंतर जोरदार मारहाण झाली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस असलेल्या पदाधिकाऱ्याला विरोधकांनी बेदम चोप दिला. दरम्यान शैलेश आजगे असं मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव असून या मारहाणीत त्याचे कपडेही फाडण्यात आले. शिवाय त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. दरम्यान, यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांनी आणि गुंडांनी मिळून माझ्यावर हल्ला केला, असा आरोप शैलेश आजगे यांनी केलाय. तसंच पोलिसांनीही बघ्याचीही भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें