सुप्रिया सुळे यांच्या व्याहींसह भाजपचे 11 उमेदवार जाहीर; नवे चेहरे कोण कोण?

सुप्रिया सुळे यांच्या व्याहींसह भाजपचे 11 उमेदवार जाहीर; नवे चेहरे कोण कोण?

| Updated on: Jun 01, 2026 | 11:56 AM

राज्यात सर्वत्र विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. माहायुतीने धक्कातंत्र वापरत अनेक चकित करणारी नावे समोर केली आहेत. महायुतीत भाजपला 11, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 अशा जागा मिळाल्या आहेत. कित्येक दावे-प्रतिदावे झाल्यानंतर अखेर एकमताने जागावाटप झाले.

राज्यात सर्वत्र विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. माहायुतीने धक्कातंत्र वापरत अनेक चकित करणारी नावे समोर केली आहेत. महायुतीत भाजपला 11, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 अशा जागा मिळाल्या आहेत. कित्येक दावे-प्रतिदावे झाल्यानंतर अखेर एकमताने जागावाटप झाले. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ काही तासांवर आली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. हा सस्पेन्स आता कायमचा संपवत भाजपने त्यांच्या 11 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपने केंद्र समितीच्या बैठकीनंतर ही नावे जाहीर केली. यामध्ये अविनाश ब्राम्हणकर, प्रवीण पोटे, पाटील धैर्यशील कदम, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपूरे, सुहास शिरसाट, अमर राजूरकर, बसवराज पाटील, नंदकिशोर महाजन, राजीव पोतदार तसेच अरुण लखाणी यांचा समावेश आहे. या उमेदवारांपैकी विशेष चर्चा ही अरुण लखाणी यांची आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी उमेदवार घोषित झालेले अरुण लखाणी हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत. या विषयावर अरुण लखाणी म्हणाले, ‘पवार कुटुंब हे खूप मोठे नाव आहे, त्यामुळे हा विषय निघणार असे वाटलंच होते.’

Published on: Jun 01, 2026 10:44 AM
Follow Us