Vaishnavi Hagawane Case : भाजपच्या चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी, क्रुरकर्मा हगवणेला….
वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. पिंपरी पोलीसांनी रात्रीच्या वेळी स्वारगेट परिसरातून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांना अटक केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा आणि दिराला अटक झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एक मोठी मागणी केली आहे. क्रुरकर्मा हरामखोरांना फाशी द्या, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं यांना मरेपर्यंत फाशी द्या, असे चित्रा वाघ म्हणाल्या. या प्रकरणात सरकारकडून चांगले वकील उभे राहतील फास्टट्रॅकवर हे प्रकरण चालेल. हगवणे कुटुंबाला असा धडा शिकवला जाईल की पुन्हा कोणी लेकी-बाळीला हात लावायचा विचार करणार नाही, असं म्हणत सर्व महिला वर्गाला चित्रा वाघ यांनी आश्वस्त केलं. पुढे त्यांनी असेही म्हटले की, वैष्णवी हगवणेची मोठी जाऊ मयुरी जगताप पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली, त्यावेळी तक्रार घेतली गेली नाही त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.
Published on: May 23, 2025 01:03 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
