Vaishnavi Hagawane Case : पोलीस मागावर असताना अटकपूर्वी हगवणे पिता-पुत्र नेमके होते कुठे? CCTV फुटेज आलं समोर अन्…
वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात येताच वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघेही १७ तारखेला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार होते.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अखेर अटक झाली आहे. दरम्यान, राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यापूर्वीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. समोर आलेल्या सीसीटीव्हीच्या दृश्यामध्ये राजेंद्र हगवणे हा मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये बसल्याचे दिसतेय.
फरार असलेल्या वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेंच्या मागावर पोलीस होते आणि त्यांचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू होता. यादरम्यान पोलिसांना वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे एका सीसीटीव्हीमध्ये स्पॉट झाले.गुरुवारी मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये ते दिसले. राजेंद्र हगवणे मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरुन सुशील निघून गेला. पोलिसांना ही माहिती समजाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली. संपूर्ण परिसरात झडती घेतली आणि दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली.