Maratha Reservation Rally : जरांगे पाटील काही मागे हटेना… भाजपचा पहिला नेता आंदोलनस्थळी भेटीला, दिलं मोठं आश्वासन
मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, आणि मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आता जरांगेंच्या या आंदोलनाला नेत्यांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला मनोज जरांगे पांटील यांनी काल सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत काल धडकले. या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातील नेते मंडळींकडून देखील पाठिंबा मिळत आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सर्वात प्रथम प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर आंदोलनस्थळी दाखल होत आपला पाठिंबा दर्शवला.
तर दुसरीकडे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव, धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचले होते. यानंतर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यासह गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही आज मनोज जरांगेची आझाद मैदानावर भेट घेतली. यानंतर भाजपचा पहिला नेता सुरेश धस हे देखील जरांगेंच्या भेटीला धावले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणं मांडू असा शब्द दिला.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

