Gopichand Padalkar : पडळकरांचे वादग्रस्त विधान कायम, मुख्यमंत्री फडणवीसांची ‘समज’ निष्फळ ठरली?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान कायम ठेवले आहे, फडणवीसांनी समज देऊनही ते आपल्या बोलण्यावर ठाम आहेत. त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन करताना, विरोधकांवरही असंसस्कृत आणि जातीयवादी राजकारण केल्याचा आरोप केला. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एका नेत्याच्या आई-वडिलांच्या चारित्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान करूनही पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिल्यानंतरही पडळकर यांनी “आपण जे बोललो, ते खरंच आहे” असे म्हटले आहे. या घटनेमुळे विरोधकांनी पडळकर फडणवीसांनाही जुमानत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप नेत्यांकडून पडळकर यांच्या आक्रमक शैलीचे समर्थन केले जात आहे, असेही दिसून येत आहे. सुरुवातीला भाजपने पडळकरांच्या विधानापासून अंतर राखले होते, मात्र आता प्रत्युत्तर म्हणून त्यांचे समर्थन केले जात आहे. काही विश्लेषकांनुसार, पडळकरांचे हे विधान मराठा आंदोलन किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असू शकतो.
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?

