Chandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते आणि भाजप नेते एकमेंकावर हल्ला चढवत आहेत. नुकतंच चंद्राकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाचा जन्म झाला आहे. शिवसेना आणि भाजपा नेते एकमेंकावर टीका करत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनीही शिवसेनेवर टीका करत शिवसेनेत एकहाती कारभार असल्याचं म्हटलं आहे. तर भाजपमझ्ये सांघिक कारभार असल्याचंही पाटील यांनी सांगितल.