AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena मतं मागायला जातील तेव्हा गोव्याची लोकं पुढे जा म्हणतील – Devendra Fadnavis

| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 7:03 PM
Share

राजभवर जाणे म्हणजे ती योग्य जागा आहे, त्या ठिकाणावर तर ऑबजेक्शन घेता कामा नये. तुमचे मंत्री जेल मध्ये जातायत. आणखी तुमचे मंत्री कुठे कुठे जातायत हे मला सांगता देखील येत नाही. त्यामुळे राजभवनावरच्या हिरवळीवर जा राजभवनावर गेल्यावर सदबुद्धी मिळेल. असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

गोवा : आज सकाळी राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) विरोधकांना खोचक टोलेबाजी केली. भाजप नेते सारखे राजभवनावर राज्यपलांकडे जातात आणि राज्य सरकारची तक्रार करतात. त्यावर बोलताना राजकीय हवा कशीही असू द्या. पण मलबार हिलची हवा चांगली असते. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. या आवारात मोरही आहेत. विषारी नागही आहेत. सर्प मित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो, असंही ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही टीका भाजपलाही चांगलीच बोचली आहे. भाजप नेत्यांकडून आता यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या गोव्यात प्रचार करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलंय. राजभवर जाणे म्हणजे ती योग्य जागा आहे, त्या ठिकाणावर तर ऑबजेक्शन घेता कामा नये. तुमचे मंत्री जेल मध्ये जातायत. आणखी तुमचे मंत्री कुठे कुठे जातायत हे मला सांगता देखील येत नाही. त्यामुळे राजभवनावरच्या हिरवळीवर जा राजभवनावर गेल्यावर सदबुद्धी मिळेल. असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.