‘माझ्यावर मोका लावून चांगलं…’, गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर पटलवार
VIDEO | लोकसभेसाठी भाजपकडून गिरीश महाजन यांना मिळणार उमेदवारी? भाजप नेत्यानं चर्चांना दिला पूर्णविराम
जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात नेहमीच वादाची ठिणगी पडत असते. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. ही टीका अनेकवेळा पातळीसोडून केली जाते. काल पुन्हा एकनाथ खडसे यांनी राजकारणातील गौप्यस्फोट केला. खडसे म्हणाले होते, गिरीश महाजन यांनी माझ्यामागे सर्व यंत्रणा लावली. ईडी चौकशी लावली, सीबीआय चौकशी सुरु केली. अन् उलट मला विचारतो की माझ्यामागे मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) का लावला? तू माझ्यामागे ईडी लावली म्हणून तुझ्यामागे मी मोका लावला, असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. खडसेंनी माझ्यावर मोका लावून चांगलं काम केलंय. खोट्या गोष्टी आता समोर आल्या आहेत, सीबीआय चौकशी करतेय. मी खडसेंवर आरोप केलेले नव्हते, अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले होते, त्या खडसेंच्या विरोधात गेल्यामुळे त्यांची चौकशी झाली होती. चौकशीत ते सर्व सिद्ध झालंय, असेही महाजन यांनी म्हटलंय
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

