तू माझ्या मागे ED लावली, यामुळेच तुझ्यामागे ‘मकोका’ लावला, दोन नेत्यांमध्ये जुंपली

Eknath Khadse and Girish Mahajan : भाजप नेते अन् मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा वाद पुन्हा समोर आला आहे. एकनाथ खडसे यांनी तपास यंत्रणेचा सत्ताधारी कसा वापर करतात, हे सांगताना आपण महाजन यांच्यांवर मकोका का लावला हे ही सांगितले.

तू माझ्या मागे ED लावली, यामुळेच तुझ्यामागे 'मकोका' लावला, दोन नेत्यांमध्ये जुंपली
eknath khadse and girish mahajan
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 3:15 PM

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या वारंवार वाकयुद्ध रंगत असतो. या दोन्ही नेत्यांमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष बघायला मिळालाय. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. ही टीका अनेकवेळा पातळीसोडून केली जाते. आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी राजकारणातील गौप्यस्फोट केला आहे. त्यावर सत्तेत येणारा कोणताही पक्ष तपास यंत्रणेचा कसा वापर करतो? हे स्पष्ट झाले आहे.

काय म्हणाले खडसे

गिरीश महाजन यांनी माझ्यामागे सर्व यंत्रणा लावली. ईडी चौकशी लावली, सीबीआय चौकशी सुरु केली. अन् उलट मला विचारतो की माझ्यामागे मोकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) का लावला? तू माझ्यामागे ईडी लावली म्हणून तुझ्या मागे मी मोकोका लावला, असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

विरुद्ध बोलणाऱ्यांवर ईडी

राज्यातील राजकारणात सरकारच्या विरुद्ध जो बोलतो त्याच्या विरोधात ईडी लावली जाते. त्याच्याविरोधात सीबीआय व इतर सरकारी यंत्रणांचा वापर करून दबाव आणला जातो, असा आरोप खडसे यांनी केला. मंत्री गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख करत गिरीशने तर माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारमध्ये असताना एवढा माज येणं बरोबर नाही. सत्तेचा माज हा फार काळ टिकत नाही, असे खडसे यांनी महाजन यांना सुनावले.

मालमत्ता जप्तीची नोटीस

आता तर न्यायालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस दिली. गिरीश महाजन यांना आम्हीच मोठे केलं हे संपूर्ण जामनेर तालुक्याला माहीत आहे. गिरीश महाजन चांगला मुलगा आहे म्हणून त्यांना आम्हीवर आणण्याचा प्रयत्न केला. नाहीतर गिरीश महाजन वडिलांच्या पेन्शनवरच जगले असते.

त्या ठिकाणी मी वाचवले

मी गेलो म्हणून गिरीश महाजन फरदापुरला वाचले. त्यावेळी कोणत्या अवस्थेत गिरीश महाजन होते, ते मी पाहिले होते. पोलीस निरीक्षकाने महाजन यांच्या कानाखाली वाजवली होती. मी होतो म्हणून वाचले. माझीच मोठी चूक झाली. त्यावेळेस गिरीश महाजन यांना मध्ये टाकला असतं तर आज बर झालं असत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.