Sanjay Raut यांचे मदारी कोण? मातोश्री की सिल्व्हर ओक? ‘या’ नेत्याचा आक्रमक सवाल
VIDEO | उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवर शिंदे गट आणि भाजपनं दिलं जोरदार हल्लबोल करत प्रत्युत्तर, संजय राऊत तुम्ही धोबी का कुत्ता.. न घर का ना घाट का... तर संजय राऊत यांचे मदारी कोण? मातोश्री की सिल्व्हर ओक? कुणी केला आक्रमक सवाल
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | देवेंद्र फडणवीस हे मदारी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे माकडं आहेत. फडणवीस डमरू वाजवत आहेत. डम डम डम डम… हे दोघे नाचत आहेत. त्यांच्या हातात काय आहे? अशी सडकून टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर केली होती. यावर शिंदे गट आणि भाजपनं प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात. तर मग तुम्ही काय करता? संजय राऊत तुम्ही धोबी का कुत्ता… न घर का ना घाट का… शिंदे फकीर , त्यांना लालच नाही, असे म्हणत संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं तर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी देखील खोचक सवाल करत विचारले, संजय राऊत यांचे मदारी कोण? मातोश्री की सिल्व्हर ओक?
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी

