राजकीय वर्तुळात ‘मदारी’, ‘डमरु’वरुन हंगामा, Sanjay Raut अन् भाजप नेत्यात जुंपली

राजकीय वर्तुळात ‘मदारी’, ‘डमरु’वरुन हंगामा, Sanjay Raut अन् भाजप नेत्यात जुंपली

| Updated on: Oct 08, 2023 | 9:57 AM

VIDEO | उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवर शिंदे गट आणि भाजपनं दिलं जोरदार हल्लबोल करत प्रत्युत्तर, बघा स्पेशल रिपोर्ट. संजय राऊत तुम्ही धोबी का कुत्ता.. न घर का ना घाट का... तर संजय राऊत यांचे मदारी कोण? कुणी केला आक्रमक सवाल

मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३ | महायुतीत भाजपच मोठा पक्ष असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यावरुन आता संजय राऊतांनी निशाणा साधला. फडणवीस मदारी असून त्यांच्या डमरुवर दोघे जण नाचतात, अशी बोचरी टीका राऊतांनी केलीय. संजय राऊतांनी फडणवीसांना मदारी म्हटलंय, तर मुख्यमंत्री शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना माकडाची उपमा दिलीय. एकनाथ शिंदेंना ईडी आणि सीबीआयनं फोडलं. आता फडणवीस डमरु वाजवतायत आणि 2 बंदर नाचतायत अशी जळजळीत टीका राऊतांनी केली. आता राऊतांनी मदारी आणि माकड म्हटल्यानं, तितक्याच ताकदीनं पलटवारही करण्यात आलाय. नितेश राणे आणि शिरसाटांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. पण फडणवीसांनी तोल न जाऊ देता प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. राऊतांनी दिल्ली दौऱ्यावरुनही मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका केलीय. नुकतंच 2 दिवस राऊत दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावरुन राऊतांनी पुन्हा टीकेची संधी साधली. काय केली सडकून टीका बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 08, 2023 09:57 AM