Pankaja Munde Video : गुलाबी शाल, पुष्पगुच्छ अन् चेहऱ्यावर हास्य.. दादांकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि पंकजा मुंडेंकडून अभिनंदन

Pankaja Munde Video : गुलाबी शाल, पुष्पगुच्छ अन् चेहऱ्यावर हास्य.. दादांकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि पंकजा मुंडेंकडून अभिनंदन

| Updated on: Jan 21, 2025 | 5:26 PM

बीड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात त्यांच्याकडून आम्हाला भरपूर आशा अन् अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझे व माझ्या संपूर्ण टीम कडून सर्वस्वी सहकार्य असेल, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी अजित दादांचे अभिनंदन केले.

बीडमधल्या संतोष देशमुख हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्री पदावर ठेवू नका असं म्हणून अजितदादा गटासह भाजपमधूनही विरोधी सूर सुरू झाला. अशातच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील धनंजय मुंडे यांच्याकडे जाऊ नये अशी काही आमदारांची मागणी होती. अशातच दोन दिवसांपूर्वी राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली. राज्यातील बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं असताना मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. कारण पंकजा मुंडे यांच्यासह धनंजय मुंडेचा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून पत्ता कट होऊन अजित पवारांकडे बीडचे पालकमंत्री गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा होत असल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच ‘मी बीडची लेक आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासतील सर्वात जास्त विकासशील असा कार्यकाल राहिलेला आहे. हे कोणत्याही विचाराचा व्यक्ती मान्य करेल. तर आता जे आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी असेन, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पंकजा मुंडे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

Published on: Jan 21, 2025 05:26 PM