‘तो’ चेक स्वीकारला नाही, पंकजा मुंडे आणि खेडकर कुटुंबीयांचा संबंध? काय दिला इशारा?
खेडकर कुटुंबीयांनी पंकजा मुंडे यांच्या संस्थेला चेक दिल्याची बातम्या खोडकर असून पंकजा मुंडेंनीच इशारा दिला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेल्या अहवालात पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा देतांना दाखवलेलं ओबीसी आणि दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होण्याची शक्यता आहे.
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आता थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे खेडकर कुटुंबीयांनी पंकजा मुंडे यांच्या संस्थेला चेक दिल्याची बातम्या खोडकर असून पंकजा मुंडेंनीच इशारा दिला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेल्या अहवालात पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा देतांना दाखवलेलं ओबीसी आणि दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होण्याची शक्यता आहे. अशातच पूजा खेडकर आणि भाजप नेत्या पकंजा मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याची चर्चा होतेय. मुंडे प्रतिष्ठानला खेडकर कुटुंबीयांनी १२ लाखांची देणगी दिल्याच्या बातम्या समोर आल्यात. मात्र त्यात काही तथ्य नाही, असा दावाच पंकजा मुंडे यांनी केला आहे. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय आहे प्रकरण ?
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर

