कुठे आहे विकास? असं ओरडणारेच जेव्हा लाभार्थी होतात…‘तो’ फोटो ट्विट करत भाजपनं घेरलं
भाजपकडून यासंदर्भात आणखी फोटो ट्विट करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे यांचा फोटो ट्वीट करत भाजपने म्हटलं. हीच तर मोदी की गॅरंटी... कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा....
मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४ : सरकारवर टीका करणारे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला. त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांचा वंदे भारतमधील प्रवासाचा एक फोटो ट्विट करत तिसरी बार….. मोदी सरकार ! असे कॅप्शन दिले आहे. इतकेच नाही तर भाजपकडून यासंदर्भात आणखी फोटो ट्विट करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे यांचा फोटो ट्वीट करत भाजपने म्हटलं. हीच तर मोदी की गॅरंटी… कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण मोदी है तो मुमकीन है…’ दरम्यान, उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यावरून परतत असताना उद्धव ठाकरे संध्याकाळी खेड स्थानकावरुन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसले आणि खेड ते मुंबई प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसमधून केला यावरूनच भाजपने त्यांना घेरलं आहे.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती

