AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'दिघेंचं नाव घेण्याची पात्रता या विषारी सापात नाही', भाजप नेत्यानं काढली संजय राऊतांची लायकी

‘दिघेंचं नाव घेण्याची पात्रता या विषारी सापात नाही’, भाजप नेत्यानं काढली संजय राऊतांची लायकी

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 27, 2024 | 2:07 PM
Share

'मी नाही त्यातली कडी लावा आतली' हा चित्रपट संजय राऊत याने काढावा. यामध्ये लागणारे सगळे गुण संजय राऊत यांच्यामध्ये आहेत, असं वक्तव्य करून भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

आनंद दिघे यांच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांपैकी संजय राऊत एक होते, अशा शब्दात भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. आनंद दिघे यांचं नाव घेण्याची संजय राऊत यांची लायकी नाही, असे वक्तव्य करत नितेश राणे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर आनंद दिघेंना ज्या गटाने त्रास दिला त्यात संजय राऊत होते, असा घणाघाती आरोपही नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. आनंद दिघे साहेब जिवंत असताना त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणारा संजय राऊत होता. म्हणून आनंद दिघे साहेबांचे नाव घेण्याची लायकी आणि पात्रता या विषारी सापामध्ये नाही, असे वक्तव्य करत नितेश राणेंनी राऊतांची लायकीच काढली. जेव्हा आनंद दिघे जिंवत होते. तेव्हा सर्वात जास्त त्रास देण्याचं काम ज्या गटाने केलं. त्या गटात संजय राऊत होता.असा एकेरी उल्लेख करत नितेश राणे यांनी घणाघाती टीका संजय राऊत यांच्यावर केली तर पुढे ते असेही म्हणले की, बाळासाहेब देव होते त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही.

Published on: Sep 27, 2024 02:07 PM
Follow Us