Satara | भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यात नुकत्याच पहिल्या टप्प्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांचा (District Bank Election) टप्पा पार पडलाय. सध्या अध्यक्ष निवडींचा कार्यक्रम सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या जिल्हा बँकेतील पराभवामुळं सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची (Satara District Bank) राज्यात सर्वाधिक चर्चा झाली होती. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्हा बँकेत सगळ्यांना सर्वांना सोबत घेऊन कारभार केला असल्यानं अध्यक्षपद मिळावं,अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे. तर, शरद पवारांनी देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी ज्या पद्धतीनं बँकेचे चेअरमन म्हणून काम केलं त्याबद्दल कौतुक केलं असल्याची माहिती आहे.

Published On - 10:31 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI