Pankaja Munde Video : ‘तिकडे सगळंच हायजॅक झालंय’, सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार
कोयते घासून ठेवा, या पंकजा मुंडे यांच्या विधानावर अधूनमधून होणाऱ्या टीकेवर सुद्धा आष्टीतून पंकजा मुंडेनी भाष्य केलं. तर जालन्याचं पालकमंत्री पद मिळालं असलं तरी आपलं बीडमध्ये आणि विशेष करून आष्टीकडेही लक्ष राहील असा सूचक इशारा पंकजा मुंडेनी सुरेश धस यांना दिला
‘बीडच्या आष्टीकडे मला जास्त लक्ष द्यावं लागेल’, असं वक्तव्य भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्या आष्टीत एका कार्यक्रमाला हजर असताना बोलत होत्या. पुढे त्या असंही म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून आष्टीचे आमदार असलेल्या सुरेश धस यांनी परळीमध्ये अवैध्य धंद्यांविरोधात आवाज उठवला होता. यानंतर पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना खोचक टोला लगावला आहे. तर पकंजा मुंडे यांनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यावं, तिकडे सगळचं हायजॅक झालंय, असं म्हणत सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केलाय. ‘बीड तर माझाच आहे. बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ते परत तिकडे राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. तर मला जर जास्त काकणभर प्रेम करावं लागेल. सारखं मला यावं लागेल’, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला होता. ‘बीड आष्टी भाजपचाच आहे. आमची काही हरकत नाही. परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे. तिकडे जास्त लक्ष द्या, तिथलं सगळच हायजॅक झालेलं आहे तिकडे बघा.. जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखीवरती द्या जास्तीत जास्त लक्ष वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातल्या गाळ आणि जमिनी हडप केल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती कशाला आम्ही किरकोळ लोक आहेत गरीब माणसं आमच्यावर धोपट्या टाकून तुम्हाला काय फायदा..’, असं सुरेश धस यांनी भाष्य करत पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिलंय.